Eknath Shinde – सप्टेंबर महिना संपत आला तरीही राज्यातील काही भागात कोसळधार सुरुच आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे, घरांचे, गुरांची नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी महायुतीचे मंत्री, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नुकसानग्रस्तांना मदतीसाठी किट देण्यात आलेत. त्याच्यावर एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला आहे. या जाहिरातीवरुन विरोधकांनी टीका केली आहे. याला शिंदेंनी जोरदार प्रतित्तर दिलं आहे.
लोकांचे सांत्वन करताना जाहिरात कशासाठी?
दरम्यान, राज्य सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापर्यंत कर्जमाफी झालेली नाही. पण सरकारकडून मदत करताना स्वतःची प्रसिद्धी केली जात आहे. अशी टीका विरोधकांनी केली आहे. यावर जोरदार पलटवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. अतिवृष्टीमुळं सध्या लोकं बेघर झाली आहेत. अनेक लोकं जखमी झालेत, जनावारे वाहून गेली आहेत. शेती पिकांचे होत्याच नव्हते झाले आहे. अशावेळी लोकांना धीर देणे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे आहे. फोटो लावून किट वाटप केले तर त्याचे कुणी राजकारण करु नये. असं शिंदेंनी म्हटलंय.

लोकांना मदत मिळणं महत्त्वाचं…
दुसरीकडे जेव्हापासून मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. तेव्हापासून सरकार इथल्या लोकांबाबत अतिशय संवेदनशील आहे. मदतीसाठी सरकारन शेतीच्या बांधावर पोहचले आहे. आम्ही तिकडे लोकांशी संवाद साधतोय आणि त्यांना धीर देत आहोत. त्यांना ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत. त्यामध्ये भांडी, कपडे, निवारा, राशन या सगळ्या गोष्टी पुरवत आहोत. जर तुम्हाला मदत करायची असेल तुम्ही करा… पण उगाच फोटोवरून राजकारण करू नका. शेवटी तिथल्या नुकसानग्रस्त भागातील लोकांना मदत मिळणे हे महत्त्वाचे आहे. पण विरोधक कोणत्याही कारणावरून टीका करतात. हे चुकीचे आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.











