नाशिक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, पूरपरिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम युद्ध पातळीवर

पूरग्रस्त भागात बेघर झालेल्या कुटुंबांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मोफत धान्य तसेच मदतीची रक्कम तात्काळ वाटप सुरू करावे. पूर परिस्थितीने बाधित झालेल्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी तात्काळ स्थलांतरित करावे.

Nashik Rain : गेल्या २४ तासापासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु आहे. त्यामुळं नाशिक जिल्ह्यातील पूरस्थितीवर प्रशासनाने सातत्याने लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, तहसील, पोलिस स्टेशन कार्यालयात तातडीने नियंत्रण कक्ष सुरू करण्यात यावे. पूरपरिस्थितीत अडकलेले नागरिक तसेच जनावरे सुरक्षित स्थळी हलवावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

मंत्री छगन भुजबळ पूरपरिस्थितीवर लक्ष ठेऊन 

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस स्टेशन पंचायत समिती सर्व ठिकाणी तत्काळ नियंत्रण कक्ष सुरू करावा अशा सूचना केल्या आहेत. तसेच मदत कक्षाचे दूरध्वनी क्रमांक सोशल मीडिया तसेच वर्तमानपत्रात जनतेसाठी तात्काळ प्रसिद्ध करावेत पूर परिस्थितीत काही तात्पुरती बेटे निर्माण झालेली आहे. अशा ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना तात्काळ सुटका करावीत. आवश्यक त्या ठिकाणी एनडीआरएफ किंवा एसडीआरएफ पथकांची मदत घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

शाळांना सोमवारी सुट्टी?

त्याचबरोबर शेती पिकांचे, घरांचे तसेच पायाभूत सुविधांचे जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे तात्काळ सुरू करण्यात यावेत. सर्व शासकीय हॉस्पिटल या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचा,औषधांचा साठा पुरेसा उपलब्ध ठेवावा. जीवनावश्यक सेवा, दूरध्वनी सेवा, खराब झालेले रस्ते, विद्युत सेवा तात्काळ पूर्ववत व्यवस्थित सुरू करणे बद्दल संबंधित विभागांनी कार्यवाही करावी.आपत्कालीन सेवेमध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या रजा तात्काळ रद्द कराव्यात. सोमवारी लहान मुलांच्या शाळा तसेच अंगणवाड्या यांना आवश्यकता असल्यास सुट्ट्या जाहीर कराव्यात तसेच जिल्ह्यातील सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत.


About Author

Astha Sutar

Other Latest News