Soyabean Price: महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांना काहीसा दिलासा; दरामध्ये इतक्या रूपयांची वाढ

महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे. कारण बाजार समित्यांमध्ये दरांमध्ये हळू-हळू सुधारणा होताना दिसत आहे.

महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये 28 आणि 29 नोव्हेंबर 2025 रोजी सोयाबीनच्या दरात मोठा चढ-उतार पाहायला मिळाला. पांढरा, पिवळा, लोकल आणि हायब्रीड या सर्वच प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक झाली. काही ठिकाणी दर स्थिर राहिले तर अनेक बाजारांमध्ये भावात मोठी वाढ दिसली. जालना, मंगरुळपीर आणि शेलूबाजार समितीमध्ये चांगला भाव मिळाला.

देशभरात यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे बियाणे दर्जाच्या सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी बियाण्याच्या सोयाबीनला बाजारात प्रचंड मागणी असून, दरही झपाट्याने वाढले आहेत. साधारण सोयाबीनचा भाव जिथे हमीभावापेक्षा हजार रुपयांनी कमी आहे, तिथे बियाणे दर्जाच्या सोयाबीनला प्रति क्विंटल ५ हजारांपासून ते तब्बल ६ हजार रुपये इतका दर मिळत आहे. बियाणे कंपन्यांकडून आक्रमक खरेदी सुरू असून, व्यापाऱ्यांच्या मते, या मागणीचा फायदा काही शेतकऱ्यांना मिळत आहे.

सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा

29 नोव्हेंबर रोजी जळकोट बाजारात पांढऱ्या सोयाबीनला सर्वसाधारण 4721 रु दर मिळाला. इथे आवक 592 क्विंटल नोंदली गेली. मुरुम बाजारात पिवळ्या जातीसाठी 4298 रु सर्वसाधारण दर होता. दोन्ही बाजारात स्थिर आणि समाधानकारक व्यापार झाल्याचे दिसते. 28 नोव्हेंबरला अनेक प्रमुख बाजारांमध्ये चांगली आवक नोंदवली गेली. माजलगावमध्ये तब्बल 3625 क्विंटल सोयाबीनची नोंद झाली आणि सर्वसाधारण दर 4400 रु राहिला. कारंजा बाजारात सर्वाधिक 7000 क्विंटल आवक होती, जिथे दर 4310 रु च्या आसपास स्थिर होते.

लासलगाव-विंचूर आणि येवला बाजार समित्यांमध्ये भाव 4400 ते 4475 रु या  दरम्यान राहिलेसिन्नर येथे किमान1300 रु चा दर नोंदला गेला असला तरी जास्तीत जास्त दर 4465 रूपर्यंत पोहोचला, जो त्या बाजारातील प्रतिसाद दाखवतो. लोकल सोयाबीनमध्ये नागपूर बाजार पुढे होता, जिथे सर्वसाधारण भाव 4577 रु नोंदवण्यात आला. सोलापूर, अमरावती, कोपरगाव आणि हिंगोली या बाजारांमध्ये 4200 ते 4450 दरम्यान स्थिर व्यापार झाला. पिंपळगाव(ब)-पालखेड येथे हायब्रीड सोयाबीनला 4450 रु सर्वसाधारण दर नोंदवला गेला. पांढऱ्या सोयाबीनमध्ये जळकोट 4755 रु आणि लासलगाव-निफाड 4375 रु हे दर राहिले.

मंगरूळपीर बाजारात विक्रमी दर

सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे जालना आणि मंगरुळपीर बाजारातील विक्रमी दर मिळाला. जालन्यात सोयाबीनचा सर्वाधिक दर 5500 रु नोंदवून राज्यातील त्या दिवशीचा उच्चांक ठरला. मंगरुळपीर आणि शेलूबाजार यांनी तर सर्व मर्यादा ओलांडत 5555 रु आणि 5328 रु पर्यंत दर गाठला.अकोला, खामगाव, यवतमाळ आणि उमरेड येथेही दर .4400 ते 4480 रु दरम्यान होते. काही ठिकाणी मात्र भाव खाली राहिले. जामखेड, भद्रावती, वरोरा, बाभुळगाव येथे  दर 3000 ते 3500 रु च्या दरम्यान राहिल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळाला नाही. 

संपूर्ण राज्यात 28 आणि 29 नोव्हेंबर रोजीचा बाजार पाहता, सोयाबीनचे दर सर्वसाधारणपणे 4200 ते 4600 रु या श्रेणीत स्थिर होते. काही ठिकाणी उच्चांक नोंदला गेला तर काही बाजारांमध्ये दर किंचित कमी राहिले. एकूणच दरामध्ये सध्या काहीशी सुधारणा होत असल्याचे शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News