नाईकांच्या बालेकिल्लात शिंदेंचा शिरकाव, नवी मुंबईतील अंकुश कदम यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

अंकुश कदम यांचा आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. अपयशातून खचून न जाता कदम यांनी आपला दांडगा जनसंपर्क संपूर्ण नवी मुंबईमध्ये कायम ठेवला आहे.

Ganesh Naik Vs Eknath Shinde – गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात विस्तव जात नाही, हे सर्वाना माहित आहे. आता आगामी काळात नाईक-शिंदे असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. सध्या ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एकहाती वर्चस्व आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या अगोदरपासून ठाण्याच्या राजकारणात सक्रिय असणारे भाजपा नेते गणेश नाईक यांचं देखील एकेकाळी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात राजकीय वर्चस्व होतं. शिंदे विरुद्ध नाईक असा वाद हा पेटला आहे. कारण शिंदेंनी नाईकांच्या नवी मुंबईतील गडामध्ये सुरुंग लावला आहे.

नवी मुंबईत शिंदेचा नाईकांना धक्का

छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश कदम यांना शिवसेनेच्या गळाला लावलं आहे. अंकुश कदम हे नाव मराठा आरक्षणच्या चळवळीमधे सर्व परिचित असं नाव आहे. अंकुश कदम यांना “बाबा” या नावानं ओळखलं जाते. अंकुश कदम यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक ही स्वराज्य पक्षाकडून भाजपा नेते गणेश नाईक यांच्या विरुद्ध ऐरोली मतदार संघातून लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आगामी ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपा विरोधात शिवसेना असा सामना होण्याची शक्यता आहे.

कोण कोणावर वरचढ ठरणार?

गणेश नाईक यांच्या नवी मुंबई महापालिकेच्या गडात सुरुंग लावण्यासाठी आता एकनाथ शिंदे यांनी देखील कंबर कसली आहे. एकनाथ शिंदे यांनी अंकुश कदम यांना आपल्या गळाला लावलं आहे. कदम यांच्या पक्षप्रवेशामुळे नवी मुंबईत पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध नाईक असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. अंकुश बाबा-कदम त्यामुळे आगामी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे हे नाईकांना धोबीपछाड देणार का? शिंदे हे नाईकांवर वरचढ ठरणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कोण आहेत अंकुश कदम

  • अंकुश कदम यांनी मराठा आरक्षणच्या लढाईमध्ये पूर्ण ताकदीनं उतरलेत.
  • अंकुश कदम यांची लोकप्रियता ही तरुणांमधे मोठ्या प्रमाणात आहे.
  • त्यांनी नेहमी प्रस्थापितांविरुद्ध विस्थापित अशी लढाई लढली आहे.
  • सातारा जिल्ह्यातील मातीतला हा तरुण आहे. त्यामुळे लढण्याची कला त्यांना जन्मापासून उपजत आहे.
  • कदम यांच्या सेनेतील प्रवेशामुळे सेनेची ताकद वाढली आहे

About Author

Astha Sutar

Other Latest News