भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा विवाहसोहळा रविवारी सांगलीत संपन्न होणार होता. काल रात्री तिचा मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला होता. यानंतर आज दुपारी तिचा लग्नसोहळा संपन्न होणार होता. परंतु, या लग्नसोहळ्यापूर्वी स्मृती मानधना हिच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्मृती मानधना हिच्या वडिलांना तातडीने सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या स्मृतीच्या वडिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
स्मृती मानधनाच्या वडीलांना हार्ट अटॅक?
सुप्रसिद्ध भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि पलश मुच्छल यांचा आज म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजी सांगलीत विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र, सांगलीतील लग्नाच्या या आनंदी वातावरणात एक दु:खद घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. लग्न समारंभाची तयारी सुरू असताना स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त आहे. त्यांना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये केले दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्मृतीसह तिचे जवळचे नातेवाईक वडिलांसोबत हॉस्पिटल मध्येच असल्यामुळे पाहुणे परतू लागले आहेत. तसेच, लग्नाचा सेटअप काढायला सुरवात झाली असून हा लग्न सोहळा रद्द होण्याची शक्यता आहे.

6 वर्षांचं प्रेम; पण, लग्नात मोठं विघ्न
स्मृती आणि पलाश 2019 पासून एकमेकांना डेट करत होते. सुरुवातीला दोघांनीही आपले रिलेशनशिप खाजगी ठेवले होते. 2024 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती समोर आली. याच वर्षी पलाशने नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये सर्वांसमोर गुडघ्यावर बसून स्मृतीला प्रपोज केलं होतं, आणि तो रोमँटिक क्षणही व्हायरल झाला होता. यांचा अजून एक रोमँटिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये दोघेही सलमान खानच्या ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणं तेनू लेके मैं जावांगा… या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत होते.
दुपारी 3.30 वाजता स्मृती आणि पलाश यांच्या विवाहचा मुहूर्त होता. या सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली असून लग्न समारंभासाठी क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत. मात्र, अचानक स्मृती मंधानाच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीय आणि पाहुण्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. आता, लग्नस्थळावर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.











