पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 21 व्या हप्त्याचे 2000 रुपये 19 नोव्हेंबरला मिळणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात एका वर्षात तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपये पाठवण्यात येणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेच्या 20 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली आहे. दरम्यान आता आगामी तीन दिवसांमध्ये योजनेचा 21 वा हप्ता वितरीत होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एकूणच अवघ्या काही तासांमध्ये 21 व्या हप्त्याचे 2,000 रूपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत.
हप्त्याच्या वितरणासाठी उरले अवघे काही तास!
केंद्र सरकार देशातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत आहे. यापैकीच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक अत्यंत लोकप्रिय योजना आहे. सहा वर्षांपूर्वी 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत सरकार लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या खात्यात जमा करते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये प्रदान केली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या खर्चासाठी मदत करणे हा आहे.

या योजनेच्या 21 व्या हप्त्याची प्रतीक्षा देशभरातील कोट्यवधी शेतकरी दीर्घकाळापासून करत होते. आता त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. केंद्र सरकार 19 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता जारी करणार आहे. देशभरातील सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18,000 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे. म्हणजेच पुढील 48 तासांमध्ये ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
21 व्या हप्त्यापासून ‘हे’ शेतकरी वंचित राहणार
केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या 21 व्या हप्त्याविषयीची सुचना देण्यात आली आहे. म्हणजे दोन दिवसानंतर 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 21वा हप्ता जमा होणार आहे. पण सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही. तर जे लाभार्थी आहेत, पण त्यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली नसेल, त्या शेतकऱ्यांना सुद्धा हा नवीन हप्ता मिळणार नाही.
- ज्या शेतकऱ्यांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, ते वंचित राहतील.
- भू-सत्यापनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अथवा अर्धवट ठेवली आहे.
- बँक खात्याचा चुकीचा तपशील दिला, तर पैसे मिळणार नाहीत.
- बँकेचा IFSC कोड चुकीचा टाकला, तर वंचित राहावं लागेल.
- नावाचे स्पेलिंग अथवा आधार चुकीचा असेल तरी पैसे मिळणार नाहीत.











