मोठी बातमी; हैदराबादमध्ये तब्बल 12 हजार कोटींची एमडी ड्रग्ज फॅक्टरी उध्वस्त; अनेक राज्यांत ड्रग्ज नेटवर्क

मिरा-भाईंदर पोलिसांनी अभूतपूर्व कारवाई करत हैदराबादमध्ये कार्यरत असलेली देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी एमडी ड्रग्ज फॅक्टरी उध्वस्त केली आहे.

मोठी आणि धक्कादाय बातमी तेलंगणाच्या राजधानीतून समोर येत आहे. मिरा भाईंदरमध्ये अवघ्या 200 ग्रॅम एमडी ड्रग्जवर कारवाई करण्यात आली, त्या घटनेचे लागेबांधे थेट 12 हजार कोटींच्या ड्रग्ज फॅक्टरीपर्यंत पोहोचले आहेत. अवघ्या देशाला हादरवणारी अशी ही बातमी हैदराबादमधून समोर आली आहे. मिरा-भाईंदर पोलिसांनी अभूतपूर्व कारवाई करत हैदराबादमध्ये कार्यरत असलेली देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी एमडी ड्रग्ज फॅक्टरी उध्वस्त केली आहे.

12 हजार कोटींच्या ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश

धडक कारवाईत 13 आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल 32 हजार लीटर कच्चा माल, धोकादायक रसायने आणि उत्पादनासाठी लागणारी यंत्रसामग्री पोलिसांनी जप्त केली आहे. या मालाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 12 हजार कोटी रुपयांहून अधिक असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. पोलिसांच्या मते, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत सक्रिय असलेल्या या ड्रग्ज नेटवर्कचा भंडाफोड झाल्याने देशभरातील ड्रग्ज पुरवठा साखळीला मोठा धक्का बसणार आहे. ही कारवाई मुळात मिरा रोड परिसरातील 200 ग्रॅम एमडी ड्रग्ज (किंमत 25 लाख रुपये) जप्त करण्यापासून सुरू झाली होती.

तपासादरम्यान पोलिसांना हैदराबादपर्यंत धागेदोरे सापडले. त्यानंतर छापा टाकून पोलिसांनी ‘मौतच्या फॅक्टरी’ची भांडाफोड केली आहे. या अंडरवर्ल्ड गॅंगशी किंवा शेजारील देशातील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांशी या नेटवर्कचे संबंध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती देण्यासाठी मिरा-भाईंदर पोलिस आयुक्त आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

देशासमोर असलेले ड्रग्ज माफियांचे संकट

देशासमोर उभे ठाकलेले ड्रग्ज माफियांचे संकट ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक समस्या आहे. तरुण पिढीला व्यसनाधीन बनवून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले जात आहे. या माफियांचा जाळा केवळ शहरापुरता मर्यादित नसून गावोगावी पसरत आहे. ड्रग्जच्या व्यवहारातून प्रचंड आर्थिक फायदा मिळवणारे गुन्हेगार समाजात भीतीचे वातावरण निर्माण करतात. कायदा व अंमलबजावणी यंत्रणांसमोर या माफियांना रोखणे हे मोठे आव्हान आहे. अनेकदा परदेशातून गुप्त मार्गांनी ड्रग्जची तस्करी केली जाते, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण होतो. त्यामुळे समाज, पोलीस व सरकार यांनी मिळून या संकटावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News