जे पी नड्डा यांचा उत्तराधिकारी कसा निवडणार? भाजपच्या घटनेत काय आहे अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया

भाजपचा पुढील राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाला मिळणार याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. दरम्यान जाणून घेऊया काय आहे भाजपची घटना?

नवी दिल्ली – भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पुढच्या महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. भाजपात या निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचंही सांगण्यात येतंय. भाजपातून मिळालेल्या माहितीनुसार जूनच्या तिसऱ्या आठवड्यात ही निवडणूक होऊ शकते.

जानेवारी 2020 पासून जे पी नड्डा यांच्याकडे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आहेत. त्यांचा कार्यकाल 2023 साली संपलाय, मात्र त्यानंतर त्यांना अनेकदा मुदतवाढ देण्यात आलीय. आता जे पी नड्डा यांचा उत्तराधिकारी कोण याची चर्चा सुरु झाली आहे. कशी असते भाजपाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि कोण यासाठी मतदान करु शकतं जाणून घेऊयात

कशी होते भाजपाच्या अध्यक्षपदाची निवडणूक

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक निवडणूक समितीच्या मार्फत करण्यात येतं. यात राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रदेश कार्यकारिणील सदस्यांचा सहभाग असतो. या निवड समितीतील कोणतेही 20 सदस्य राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा प्रस्ताव संयुक्तपणे मांडू शकतात. हा प्रस्ताव किमान पाच राज्यांतून येण्याची अट आहे. या पाच राज्यांत राष्ट्रीय परिषदेचे निवडणूक होणंही गरजेचं असतं. तसंच नामांकन पत्रावर उमेदवाराची स्वाक्षरीही गरजेची असते.

चार कार्यकाळासाठी पक्षाची जबाबदारी असलेला आणि किमान 15 वर्ष भाजपाचा प्राथमिक सदस्य असलेला व्यक्ती अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास पात्र असतो. भाजपानं संघटनात्मक दृष्ट्या देशात 36 प्रांत केलेले आहेत. यातील 18 पेक्षा जास्त संघटनात्मक निवडणुका होणंही गरजेचं असतं.

भाजपात अध्यक्षपदाची निवडणूक कधी झाली

भाजपाच्या घटनेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया लिहिलेली असली तरी आजपर्यंत एकदाही राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक झालेली नाही. संघ आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सर्वसहमतीतून या नाववर शिक्कामोर्तब करण्यात येतं, अशी परंपरा आहे.

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाल हा तीन वर्षांचा असतो. गडकरी अध्यक्ष असताना घटनेत बदल करुन दोन टर्म एकाच अध्यक्षाला दिले जातील हा बदल करण्यात आला होता. मात्र नितीन गडकरी आणि जे पी नड्डा या दोन्ही नेत्यांना असा दुसरा कार्यकाळ मिळालेला नाही. याबरोबरच भाजपात एक व्यक्ती एक पद हा नियमही लागू आहे


About Author

Smita Gangurde

Other Latest News