राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी 40 एकर जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेत सरकारची फसवणूक केली असल्याचा आरोप गेली दोन दिवसांपासून होत होता. त्या आरोपांनंतर चौकशी समितीही गठीत करण्यात आली आहे. दरम्या आज, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द झाला असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
अखेर ‘तो’ व्यवहार रद्द, विरोधक आक्रमक
पार्थ पवार यांनी 40 एकर जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेत सरकारची फसवणूक केली असल्याचा आरोप गेली दोन दिवसांपासून होत होता. त्या आरोपांनंतर चौकशी समितीही गठीत करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र पार्थ पवारांसमोरील अडचणी वाढताना दिसत होत्या. त्यानंतर अखेर आता हा व्यवहार रद्द करण्यात आला आहे.

प्रकरण अंगलट म्हणून काढता पाय?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रकरण अंगाशी आल्यानंतर जमीन परत करण्याचं सूचत आहे. जैन बोर्डिंग प्रकरणात आल्यानंतर मोहोळांनी जमीन परत करण्याचं ठरवलं. जमीन परत केली जाईल यावर ही गोष्ट भागते का? याच्यावर काहीच कारवाई केली जाणार नाही का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्यातील हायप्रोफाईल अशा कोरेगाव आयटी पार्क परिसरातील सरकारी जमीन कमी किंमतीत खरेदी केल्याचा आरोप करण्यात येतोय. या जमिनीचा बाजारभाव तब्बल 1800 कोटी होता. पण पार्थ पवारांच्या कंपनीने ही जमीन 300 कोटीत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. दुसरीकडे यामध्ये शासनाची तब्बल 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी पार्थ पवारांनी बुडविल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील काळात आणखी मोठा ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे.
व्यवहार रद्द झाल्यानंतर दादा म्हणाले…
या व्यवहारात माहिती घेतली, चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला होते. मी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला. जरी माझ्या घरातल्या जवळच्यांचा विषय असला तरी तुम्ही राज्याचे प्रमुख आहात. जे काही नियमाप्रमाणं करावं लागेल, चौकशी करावी लागेल, समिती नेमायची असेल ते करा माझा त्या गोष्टीला पाठिंबा राहील. आरोपातील वस्तूस्थिती जनतेला कळणं आवश्यक असते. या व्यवहारात रुपया देखील दिला गेला नाही. मोठे आकडे सांगितले गेले, गोष्टी सांगितल्या गेल्या. परंतु, मला आज जे कळालं जो काही व्यवहार झाला होता तो रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.











