मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने आक्रमक भूमिका मांडणारे आणि सरकारला सळो पळो करून सोडणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना 2024 चा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी चक्क एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर मिळालेली होती अशी माहिती समोर येत आहे. मात्र जरांगे पाटील यांनी ती ऑफर धुडकावून लावलीमी मी समाजासाठी काम करणारा माणूस आहे असे सांगत कारण की पाटील यांनीही ऑफर नाकारली.
कोणी दिली होती ऑफर
धनंजय मुंडे यांच्या पत्नी करून मुंडे यांनी त्यांच्या स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षपदासाठी मनोज जरांगे पाटील यांना ऑफर दिली होती . मनोज जरांगे पाटील यांनी स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्ष व्हावे आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा अशी विनंती करूणा मुंडे यांनी केली होती.

काय म्हणाल्या करूणा मुंडे?
करुणा मुंडे (Karuna Munde) यांची आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मी मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे एक निवेदन घेऊन गेली होती. मी त्या निवेदनात म्हंटल होत कि, आपण महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी आणि राजकारणात बदल घडवण्यासाठी स्वराज्य शक्ती सेना पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारलं पाहिजे. जरांगे भाऊ आज तुमच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जनप्रतिसाद आहे. त्यामुळे तुम्ही माझे निवदेन स्वीकारा आणि माझ्या पक्षाचे अध्यक्षपद तुम्ही स्वीकारा. मला पार्टीचे कोणतेही पद नको, कोणतेही तिकीट नको. फक्त तुम्ही स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्षपद स्वीकारा आणि नवनवीन लोकांना संधी देऊन महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्या अशी विनंती मी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडे केली होती असं करुणा मुंडे यांनी म्हंटल.
जरांगे काय म्हणाले?
करुणा मुंडे यांची हि विनंती मनोज जरांगे पाटील यांनी नाकारली. मी एक समाजकारणी माणूस आहे. मी समाजासाठी लढतो असं सांगून मनोज जरांगे पाटील यांनी हे अध्यक्षपदाची मागणी नाकारल्याचे करुणा मुंडे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं. परंतु या बातमीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ मिळाली.











