धोनीची जादु चाललीच नाही,चैन्नई प्लेऑफमधून बाहेर! पंजाब विरुद्ध दारुण पराभव,चहलची हॅटट्रीक

महेंद्रसिंग धोनी, दीपक हुडा, अंशुल कंबोज कंबोज, नूर अहमद या चार बॅटरला आऊट करत चैन्नईला चहलने रोखले. चार बॅटरला आऊट करण्यासाठी त्याने अवघ्या 32 धावा मोजल्या. चहलने हॅटट्रीक करत विक्रम रचला.

चेन्नईन : पहिल्यांदा बॅटींग करताना चैन्नईने पंजाबसमोर 191 धावांचे टार्गेट ठेवले होते. हे टार्गेट पंजाबचा कर्णधार श्रेय्यश अय्यर याच्या 72 धावांच्या जोरावर पंजाबने सहज पार केले. पंजाबकडून यजुर्वेंद्र चहल याने अवघ्या 32 धावांत चार बॅटरला आऊट करत चैन्नईला 190 धावांवर रोखले. चैन्नईचे 10 सामन्यात चार पाॅईंट आहेत. त्यामुळे चेन्नई यंदाच्या आयपीएलच्या प्लेऑफमधून बाहेर झाली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीची जादू चालली नाही.

चैन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या 21 धावा असताना शेखर रशीद आऊट झाला त्याच्या पाठोपाठ आयुष म्हात्रे देखील मार्को जेनसनच्या चांगल्या बाॅलवर श्रेयश अय्यरकडे कॅच देऊन आऊट झाला. त्यामुळे चेन्नईची अवस्था दोन बाद 22 झाली होती. रवींद्र जडेजा देखील 17 धावा काढून ब्रारच्या बाॅलिंगवर आऊट झाला. त्यामुळे चेन्नईची अवस्था तीन बाद 43 झाली.

सॅम करनने सावरले

एका बाजुला विकेट पडत असताना सॅम करनेने पंजाबच्या बाॅलरची चांगलीच धुलाई केली. त्याने 47 बाॅलमध्ये नऊ चौकारा आणि चार षटकारांच्या मदतीने 88 धावांची वादळी खेळी केली. डेवाल्ड ब्रेव्हिस याने देखील त्याला चांगली साथ दिली. तो 32 धावा काढून बाद झाला. त्यानंतर शिवम दुबे आणि महेंद्रसिंग धोनी स्वस्थात माघारी परतले. धोनी अवघ्या 11 धावा केल्या.

चहलच्या फिरकीपुढे चैन्नईची शरणागती

यजुर्वेंद्र चहल याने पंजाबकडून अचूक मारा करत चैन्नईला 190 धावांवर रोखले. एकावेळी पंजाब 200 चा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते. मात्र,महेंद्रसिंग धोनी, दीपक हुडा, अंशुल कंबोज कंबोज, नूर अहमद या चार बॅटरला आऊट करत चैन्नईला चहलने रोखले. चार बॅटरला आऊट करण्यासाठी त्याने अवघ्या 32 धावा मोजल्या. चहलने हॅटट्रीक करत विक्रम रचला.

प्रभसिमरन सिंग-अय्यरची फटकेबाजी

पंजाबचा ओपनार प्रियांश आर्याला 23 धावांवर खलील अहमदने आऊट केले.मात्र, त्यानंतर त्यांनी प्रभसिमर सिंग आणि कर्णधार श्रेयश अय्यरने डाव सावरला. प्रभसिमरन सिंगने 54 धाव करत पंजाबला सावरेल. यामध्ये त्याने तीन सिक्स लगावले. श्रेयश अय्यरने देखील आपले अर्धशतक केले. अय्यरने 41 बाॅलमध्ये 72 रन्स केले.


About Author

Arundhati Gadale

Other Latest News