Smriti Mandhana Wedding: स्मृती मंदानाचं लग्न कधी आणि कुठे होणार? समोर आली तारीख आणि ठिकाण

Smriti Mandhana wedding date:   भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंदाना लवकरच प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छलची नवरी होणार आहे. तिने गुरुवारी तिच्या सोशल मीडिया हँडलवर एका रीलद्वारे पलाशशी तिच्या साखरपुड्याची पुष्टी केली. स्टार ओपनरने “मुन्नाभाई स्टाईल” मध्ये तिच्या साखरपुड्याची घोषणा केली.

 

टीम इंडियाची तयारी सुरू-

स्मृती मंदानाच्या लग्नाची तयारी आधीच सुरू झाली आहे. गुरुवारी जेमिमा रॉड्रिग्जने तिच्या सोशल मीडिया हँडलवर टीम इंडियाची एक मजेदार रील शेअर केली. त्यामध्ये मानधनाने “मुन्नाभाई-स्टाईल” ने तिच्या साखरपुड्याची बातमीला दुजोरा दिला. व्हिडिओमध्ये मानधना टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंसोबत तिच्या लग्नाचे खास क्षण साजरे करताना पाहायला मिळत आहे.

 

२३ नोव्हेंबरला अडकणार लग्नबंधनात-

स्मृती मंदाना आणि पलाश मुच्छल हे महाराष्ट्रातील सांगली गावात लग्न करणार आहेत. २३ नोव्हेंबर रोजी हे जोडपे लग्न करणार आहे. या हाय-प्रोफाइल लग्नाच्या निमंत्रण पत्रिका मुच्छल कुटुंबाच्या नातेवाईकांना आणि इंदूरमधील पाहुण्यांना वाटण्यात आल्या आहेत.

लग्न आणि नंतरची पार्टी सांगलीमध्ये होईल. मुच्छल कुटुंबाने अद्याप इंदूरमध्ये रिसेप्शन आयोजित करण्याची योजना आखलेली नाही. असे वृत्त आहे की पलाश आणि स्मृती मुंबईत लग्नानंतरची रिसेप्शन पार्टी आयोजित करू शकतात, ज्यामध्ये चित्रपट उद्योगातील कलाकार आणि क्रिकेटपटू उपस्थित राहू शकतात.

टॅटूमुळे पलाश होता चर्चेत-
स्मृती मानधनाने २०२५ च्या महिला विश्वचषकात शानदार कामगिरी केली. विजयानंतर पलाश मुच्छलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या हातावर “SM18” टॅटू स्पष्टपणे दिसत आहे. या टॅटूमधील SM म्हणजे स्मृती मंदाना आहे आणि १८ हा आकडा तिच्या वाढदिवसाची तारीख आहे. जो तिचा जर्सी क्रमांक देखील आहे. यामुळे पलाश चर्चेत आला होता.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News